शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सरासरीच्या १११ टक्के पाऊस; इंदापूर, दौैंड, शिरूर कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:24 AM

जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही.

पुणे : जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर,दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही. तेथे पावसाने चांगलीच ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. चारा, पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे नेहमी आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यात सुरुवातीलाच आगमन केल्याने यावर्षी तेथील परिस्थिती बदलेल अशी आशा लागली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५0 मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ५0१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. टक्केवारीत तो १११ टक्के इतका आहे.जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १६0९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत २२२ टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल मुळशी तालुक्यात १४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १५0 टक्के पाऊस झाला आहे. भोर १७६ टक्के, जुन्नर १३१ टक्के, खेड १२0 तर पुरंदर १0१ टक्के पाऊस झाला आहे.>दमदार पावसाची आजही गरज...जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, या पैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, ३४२ टक्के एवढ्या क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.>इंदापूर, दौैंड व शिरूरला ओढजिल्ह्यातील नेहमीच आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांतील बारामती वगळता इंदापूर, दौैंड व शिरूरला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ९६ टक्के पाऊस झाला असून, इंदापूरला ८६, दौैंडला ६४ तर शिरूरला ५४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणीटंचाई निर्माण होत आहे.>इंदापूरला ओढे, नाले कोरडे ठणठणीतइंदापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरविली असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. ओढे, नाले वाहून गेले नसल्याने अर्धा पावसाळा संपत आला, तरीही कोरडे ठणठणीत दिसत आहेत. पाणी नसल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. जनावरांना चारा पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.>चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची अटोक्यातपावसाळा सुरू होऊन अडिच महिने उलटले तरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे, अशी परिस्थीती असून देखिल तालुक्यात टंचाईसदृश चित्र नाही. ग्रामपंच्याययतींकडून अद्याप पाणीटंचाईविषयी काही अहवाल पंचायत समितीकडे प्राप्त झालेले नाही. चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची परिस्थीती आटोक्यात राहिली असे तहसिलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळ