लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनानेच व्यापलेल्या मागील संपुर्ण आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने प्रवासी वाहतूक बंद असतानाही फक्त मालवाहतूकीतून १३० कोटी ४३ लाखाचे ऊत्पन्न मिळवले. त्यासाठी १२ लाख ९० हजार टन मालाची त्यांनी वाहतूक केली. त्यात साखर, खते, यंत्रांचे सुटे भाग याचा समावेश आहे.
कोरोना.काळात मागील वर्षात सुरूवातीचे ६ महिने रेल्वेची प्रवासी वाहतूक पुर्ण बंद होती. याच काळात देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूक करून पुणे रेल्वे विभागाने उत्पन्न मिळवले. त्याचबरोबर यावेळी प्रथमच बांगला देशात रेल्वेने कार पाठवून आंतरराष्ट्रीय माल वाहतूकही केली.
पुणे विभागाच्या रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्यांचे या कामासाठी अभिनंदन केले. अतिरिक्त प्रबंधक सहर्ष बाजपेयी, नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ प्रबंधक डॉ. स्वप्नील निला, वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा तसेच विपणन व व्यापार कक्षातील अधिकारी कर्मचारी यांचे यात योगदान होते. शर्मा यांनी त्यांनाही धन्यवाद दिले.