शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

बारावीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार हॉल तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 5:12 PM

राज्यमंडळतर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू केल्या जाणार आहे

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे.

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रत प्रिंट करून द्यावी. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आले आहेत. राज्य मंडळा तर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार आहेत या परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची  स्वाक्षरी व शिक्का घ्यावी.

हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.त्याचप्रमाणे हॉल तिकीट वरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला पुनश्च प्रिंटआउट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे. फोटो सदस्य असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाStudentविद्यार्थी