पुणे : शहरातील वाढत्या वाहनसंख्येबरोबर वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, बुधवारी एका दिवसात तब्बल १२ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची शहरात नोंद करण्यात आली़. त्यात २० लाख ६२ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे़. १ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत शहरातून तब्बल १ हजार ५५० वाहने चोरी गेली आहेत़. शहरात होणारे जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, चोऱ्यांपेक्षा वाहनचोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत़. त्याच वेळी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे २८ टक्के इतके आहे़. शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़. यावर्षी १ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ५५० वाहने चोरीला गेली असून, त्यात सर्वाधिक उपनगरांचा भाग असलेल्या परिमंडळ ५ मधून तब्बल ४२७ वाहने चोरीला गेली आहेत़. बुधवारी एकाच दिवशी तब्बल १२ वाहने चोरीला गेल्याची नोंद शहरातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़. त्यात हडपसरमधून एक ट्रक व २ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत़. सिंहगड रोड पोलीस ठाणे ३, चतु:शृंगी २ तसेच मुंढवा, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येक एक दुचाकी चोरीला गेल्या आहेत़. भारती विद्यापीठ पोलिसांनी २ मोटारसायकली चोरणाºया दोघांना अटक केली आहे़. १ जानेवारी ते १ नोव्हेंबरपर्यंत २०१८ मध्ये १ हजार ६७३ वाहने चोरीला गेली होती़ त्यापैकी ५९६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले होते़ हे प्रमाण ३५ टक्के होते़. याच कालावधीत २०१९ मध्ये १ हजार ४४७ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ४०९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे़. हे प्रमाण २८ टक्के इतके आहे़ भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहनचोरी करणाºया दोघांना अटक केली. असून, त्यांच्याकडून २ गुन्हे उघडकीस आणले आहेत़. विशाल संतोष खैरे (वय १९) आणि राहुल भीमा पिंपळे (वय २०, दोघे रा़ धाऊरवाडी रोड, ता़ खंडाळा, जि़ सातारा) अशी त्यांची नावे आहेत़. त्यांनी सुखसागरनगर येथील दोन्ही गाड्या चोरून नेल्या. .......१ जानेवारी ते २७ नोव्हेंबरपर्यंत चोरीला गेलेली वाहनेपरिमंडळ १ २९०परिमंडळ २ २९८परिमंडळ ३ २१८परिमंडळ ४ ३१७परिमंडळ ५ ४२७एकूण १५५०
पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:44 AM
शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़...
ठळक मुद्दे१ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत शहरातून तब्बल १ हजार ५५० वाहने गेली आहेत़ चोरीला २० लाख ६२ हजारांचा माल चोरीला