पुणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे एक महिन्यांपासून बंद आहेत. शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन -तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे सुरू झाले आहे. आता पर्यंत विभागात 1 हजार 149 उद्योग, धंदे सुरू झाले असून, यात पुणे जिल्ह्यात 454 उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गेल्या एक महिन्यांपासून कामधंदा नसलेल्या तब्बल 50 हजार कामगारांच्या हाताला काम मिळाले असल्याची माहिती सहसंचालक (उद्योग) सदाशिव सुरवसे यांनी दिली.महाराष्ट्र आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली.यामुळे गेल्या एक महिन्यांपासून पुणे जिल्हासह विभागातील सर्व उद्योग धंदे बंद आहेत. यामुळे लाखो कामगार, कर्मचारी यांना देखील काही कामधंदा नसून, हातांना काम नसल्याने बेरोजगारांची प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात अत्यावश्यक सेवा उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, कर्मचारी, कामगारांना पास देणे, माल वाहतुकीस परवानगी आदी सर्व वेळेत पूर्ण करून तातडीने सर्व उद्योग धंदे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत.यामुळे गेल्या दोन दिवसांत विभागामध्ये 1 हजार 149 उद्योग धंद्याना परवानगी देण्यात आली असून, यामध्ये औषधे, ट्रगज् फुड प्रोसेसिंग, अ?ॅग्रीकल्चर प्रोसेसिंग, डिअर प्रॉडक्ट आदी गोष्टींचा समावेश असल्याचे सुरवसे यांनी सांगितले. ----- आता पर्यंत परवानगी देण्यात आलेल्या उद्योगांची व कामगारांची संख्या जिल्हा उद्योग कामगार पुणे 454 15786सातारा 140 16070सांगली 327 2662कोल्हापूर 128 5257एकूण 1149 45728-------- 20 एप्रिल नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना देखील परवानगी देण्यात येणार आहेत. यासाठी शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पुणे जिल्हासह विभागातील एमआयडीसी मधील देखील कंपन्या काही अटींवर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. -सदाशिव सुरवसे ,सहसंचालक (उद्योग)
पुणे विभागात 1200 उद्योग धंदे सुरू ; ५० हजार कामगारांना मिळाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:51 PM
शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन -तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे सुरू
ठळक मुद्देमंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात अत्यावश्यक सेवा उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय20 एप्रिल नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांन परवानगी