स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आणि आंबवडे प्रिमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. आरोग्य तपासणीमध्ये इसीजी, हिमोग्लोबीन रक्तगट आणि नेत्र तपासणी करण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोविड लसीकरणामुळे रक्तदानाची चळवळ मंदावली आहे. लस घेतल्याने अनेकांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी म्हणून प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षासाठी ५ लाख रुपयांचा किमतीचा अपघाती विमा एक दिला गेला तसेच हर्ष फाउंडेशनकडून रक्तदात्यांना रक्ताची व प्लाझ्माची गरज भासल्यास उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आली.
यावेळी आप्पासाहेब घोरपडे आणि हर्ष फाउंडेशन, सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी, मिरज व सांगली येथील सेवा सदन नेत्रालयाचीच टीम, आंबवडे ग्रामपंचायत, श्री नागेश्वर विद्यालय, आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, मार्तंड देवस्थान, सकल मराठा, कर्मयोगी प्रतिष्ठान, धनकवडी, भोर तालुका प्रहार अपंग संघटना, सह्याद्री रेस्क्यू टीम, संगणक परिचालक संघटना, मोरया प्रतिष्ठान कारी, मावळा प्रतिष्ठान, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, सीएमएस ग्रुप ,खंडाळा आदींंचे सहकार्य लाभले.