लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानाच्या २६ रक्तदान शिबिरात १२४० जणांनी रक्तदान केले. प्लाझ्मा दानातून १५०० जणांच्या जीवाचा धोका टळला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी राज्य सरकारने केलेल्या रक्तदान शिबिरांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजक सचिन भोसले व रवी शिंगणापूरकर यांनी सांगितले.
पुणे शहरात मागील १५ दिवसांत विविध ८ भागांमध्ये झालेल्या २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन झाले. प्लाझ्मादानासाठी होत असलेल्या प्रयत्नांमधून आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून १ हजार ५०० गंभीर रूग्णांना जीवदान मिळाले आहे.
शहरातील १२ रक्तपेंढींनी शिबिरासाठी सहकार्य केले. सार्वजनिक गणेश मंडळ, मंदिर विश्वस्त मंडळ व त्यांचे कार्येकर्ते, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्तेही शिबिरांसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत.
-----------------