लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी, नीरा, परिंचे, बेलसर येथील शासकीय लॅबमध्ये ३८७ संशयीत रुग्णांची कोरोना चाचणीत करण्यात आली. यापैकी १२५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ९, जेजुरी ११, ग्रामीण भागातील विविध गावातील ७७ तर, तालुक्याबाहेरील २८ रूग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. पुरंदर तालुक्यात ५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये ६७ संशयीत रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १५ रूग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ६, आंबळे २, हिवरे, चांबळी, पारगाव, शिवरी, कोडीत, रिसे, केतकावळे येथील प्रत्येकी १ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ९४ संशयीत रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी ४१ रूग्णांचे अहवाल बाधित आले. पवारवाडी ४, पिंपरे, राख, पोंढे, कोथळे प्रत्येकी ३, जेजुरी, खोमणेमळा, मावडी सुपे, नाझरे सुपे प्रत्येकी २, भोरवाडी, कोळविहिरे, नावळी, नाझरे (क.प), पिंपरी, साकुर्डे येथील प्रत्येकी १ रूग्ण, तालुक्याबाहेरील मोराळवाडी, मुर्टी २, बोरकवाडी, पडवी, पाडेगाव, सोमेश्वर, सुपा येथील प्रत्येकी १ रूग्ण आढळला आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदार मोहिमेअंतर्गत ' परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६ संशयीत रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. यापैकी ७ रूग्णांचे अहवाल बाधित आले. वीर ३, परिंचे २, सटलवाडी, कोडीत (बु) प्रत्येकी १.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३४ संशयीत रुग्णांची अँटीजन तपासणीत करण्यात आली. यापैकी १९ रूग्णांचे अहवाल बाधित आले. नीरा ७, कर्नलवाडी १, तालुक्याबाहेरील फरांदेनगर ६, निंबुत ४, पिंपरे १.
बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी सर्वच रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार (दि.१४) ९४ संशयीत रुग्णांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी घेण्यात आली होती. प्रलंबित अहवाल शनिवार (दि.१५) प्राप्त झाले. यापैकी ३८ रूग्णांचे अहवाल बाधित आले.
जेजुरी ९ , नावळी ५, पिसर्वे , वाल्हे ३, नाझरे २, बेलसर, राख, रिसे, नीरा, साकुर्डे, कोथळे, हरणी, राजूरी, भोसलेवाडी प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील सोमेश्वर ७, चांगदेववाडी १. सासवड येथील ग्रामीण रुगणालयात गुरुवार (दि.१३) ४० संशयीत रूग्णांची आर.टी. - पी।सी.आर. चाचणी घेण्यात आली होती. यांचे प्रलंबित अहवाल शनिवार (दि.१५) प्राप्त झाले. यापैकी ४ रूग्णांचे अहवाल बाधित आले आहेत.