यवत परिसरातील अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरू लागली असून यवत गावात मागील दोन दिवसांत १३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
यवत ग्रामीण रुग्णालयात दिण१६ व दि.१७ रोजी घेतलेल्या २०३ पैकी ४९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. बधितांपैकी २७ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे.
गावाचे नाव व बाधित रुग्णांची संख्या यवत - १३, केडगाव - ९, वरवंड -२ , पारगाव - ४, राहू - ५, पाटस - १, कासुर्डी - ४, खामगाव - ३, देलवडी - १, सोरतापवाडी (ता. हवेली) -२, देऊळगाव गाडा - १, वाळकी - १, गलांडवाडी - १, माळवाडी - १, उरुळी कांचन - १ दरम्यान, यवत ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले कोविड सेंटर आताच पूर्ण क्षमतेने भरू लागले असून वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मागील वर्षी प्रमाणेच यंदाही उपचारासाठी अडचणींना सामोरे जावे लागू शकते.