ओतूर परिसरात सोमवारी १०, मंगळवारी १४, बुधवारी १८, गुरुवारी १३ असे रुग्ण सापडले आहेत. नेतवडमाळवाडी बाधितांची संख्या ९७ झाली आहे. ८५ जण बरे झाले आहेत तर ७ जण उपचार घेत आहेत. ८ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील २७४ बाधितापैकी२४८ बरे झाले आहेत. १५ जण उपचार घेत आहेत तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील १६६ पैकी १४८ बरे झाले आहेत १३ जण उपचार घेत आहेत तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ओतूर शहरातील १ हजार २४९ बाधितापैकी १ हजार १६८ बरे झाले आहेत, ४० जण उपचार घेत आहेत तर ४१ जणांचा मृत्यू झाला आहे असे सारोक्ते व शेखरे यांनी सांगितले.
गुरुवारी ओतूर परिसरात १३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:15 AM