भोर : शिक्षण विभागांतर्गत भोर तालुक्यातील १३ नवीन शाळा वर्ग खोल्यांचे बांधकाम, तसेच ३६ प्राथमिक शाळादुरुस्ती यासाठी २ कोटी ३३ लाख ७० हजार येवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
कापूरव्होळ, कुंड, केळवडे, गोकवडी, चौका कारी, डेहण, धारांबे, निळकंठ, बारे खु., माझेरी, म्हसर खु., वरोडी खु वरोडी डायमुख अशा प्रत्येकी वर्ग खोलीस ७.५० लाख या प्रमाणे ९७.५० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर प्राथमिक शाळादुरुस्तीसाठी नांदगाव, म्हसर बु., रायरी, कोळेवाडी, उत्रौली, भावेखल, अंगसुळे, पानव्हळ, कोर्ले, धामणदेव, म्हाळवडी, सणसवाडी शिंद, नानाचीवाडी, नर्हे, तेलवडी, जांभळी, सांगवी बु., बोपे, वेळवंड, नांदघुर, नसरापूर, सांगवी खु., वागजवाडी, केंजळ, सिध्देश्वर नगर, वागजवाडी, पांडे, ब्राम्हणघर, देवघर, पाले, हातनोशी रामोशीवाडी, शिरवली हि. मा., कुडली खु., गुढे, करंदी खेबा, महुडे बु. घेवडेश्वर, मळे येथील शाळांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३६ हजार २० असा एकूण २ कोटी ३३ लाख ७० हजार लक्ष निधी भोर तालुक्यातील नवीन वर्ग खोली व प्राथमिक शाळादुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आल्याचे रणजीत शिवतरे यांनी सांगितले.