शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मोठी बातमी! संतोष जाधव टोळीकडून १३ पिस्तुले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 3:44 PM

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई....

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका व्यावसायिकाला संतोष जाधव याने व्हाॅटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी दिली नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधव याला अटक केल्यानंतर हा प्रकाराची माहिती या व्यावसायिकाने दिली असून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष जाधव याच्या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १३ पिस्तुले, मोबाईल जप्त केले आहेत. जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३, रा. मंचर, श्रीराम रमेश थोरात (वय ३२, रा. मंचर), जयेश रतिलाल बहिराम (वय २४, रा. घोडेगाव), वैभव ऊफर् भोला शांताराम तिटकारे (वय १९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहीत विठ्ठल तिटकारे (वय २५, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय २२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाई बक्श मुंढे (वय २०, रा. घोडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जयेश बहिराम (५ गावठी पिस्तुल, १ मोबाई), रोहीत तिटकारे (३ पिस्तुल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरयर), व इतरांकडून प्रत्येकी एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके उपस्थित होते.संतोष जाधव याने ५ ते ६ महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला व्हॉटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी संतोष जाधव याने पुन्हा एकदा कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र घाबरुन त्यांनी कोठेही वाच्यता केली नव्हती. पोलिसांनी संतोषला पकडण्यावर त्यांनी ही माहिती सांगितली.

संतोष जाधव याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जयेश व मनवर यांना मध्य प्रदेशात पाठवून तेथून गावठी पिस्तुलाचा साठा आणण्यास पाठविले होते. त्यानंतर पोलिसांनी नहार, थोरात व त्यानंतर एका ऐकाला अटक करुन त्यांच्याकडून ही शस्त्रे हस्तगत केली. नहार, थोरात व अल्पवयीन मुलगा यांना खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठविण्याचा कट रचला होता.

हरियाणाला पाठविली जाणार होती-ही शस्त्रात्रे मुसेवाला हत्याकांडानंतर आणण्यात आली आहेत. मध्य प्रदेशातून ही पिस्तुले आणण्यात आली असली तरी त्याच्याबरोबर गोळ्या आणण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या पिस्तुलांचा उपयोग काय, कशासाठी आणली होती असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा ही पिस्तुले हरियानाला पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या टोळीतील अनेकांवर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीपासून चोरीचे गुन्हे आहेत.ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नेताजी गंधारे, किरण भालेकर, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सनिल धनवे, विनोद दुर्वे, हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, महेश बनकर, जनार्दन शेळके, अतुल डेरे, अजित भुजबळ, कारंडे, शेख, दत्तात्रय तांबे, विक्रम तापकीर, गुरु जाधव, सहायक फौजदार पंदारे, पठाण, धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, सचिन कोबल, नवीन अरगडे यांच्या पथकाने केली.

संतोष जाधव अथवा त्याच्या त्याने कोणी खंडणीची मागणी केली असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र