जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार येथे रविवारी १३ हजार ७६४ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १९० रुपये ते २११ रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारपेक्षा प्रतवारीनुसार १० किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव : कांदा नं. १ ( गोळा ) १९० रुपये ते २११रुपये .
कांदा नं. २( सुपर )-१५० रुपये ते १९० रुपये .
कांदा नं. ३( गोल्टा )-१०० रुपये ते १५० रुपये .
कांदा नं. ४-(गोलटी / बदला )-५० रुपये ते १००रुपये.
बटाटा बाजारभाव: रविवारी फक्त ४८ बटाटा व लसूण २ पिशव्या आवक झाली. बटाटा १० किलोस प्रतवारीनुसार ७० रुपये ते १६० रुपये व लसणास १० किलोस प्रतवारीनुसार १५० रुपये ते२१२ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती ़ओतूर मार्केट कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली .