पुणे : प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तेरा गावांची शासनाच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेत निवड करण्यात आली. बारामती तालुक्यातील कटफळची मात्र पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांचा विचार करण्यात आला होता. तसेच तालुकास्तर आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी पाच वेगवेगळ्या निकषांमधून या गावांची निवड केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली. आंबेगावमधून गावडेवाडीची निवड केली. बारामती तालुक्यातून कटफळची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर सांगवी, तर तिसऱ्या क्रमांकावर सुपा होते. भोर तालुक्यातून केंजळची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर किकवी, तर तिसऱ्या क्रमांकावर आळंदे होते. दौंड तालुक्यातून गलांडवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर वाखारी, तर तिसऱ्या क्रमांकावर गार होते. हवेली तालुक्यातून सांगरूणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर आष्टापूर, तर तिसऱ्या क्रमांकावर खामगाव टेक होते. इंदापूर तालुक्यातून गंगावळणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर डिकसळ, तर तिसऱ्या क्रमांकावर कांदलगाव होते. जुन्नर तालुक्यातून ठिकेकरवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर काळवाडी, तर तिसऱ्या क्रमांकावर मांजरवाडी होते. खेड तालुक्यातून आंबेठाणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर कान्हेवाडी तर्फे चाकण होते. मावळ तालुक्यातून वाकसईची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर टाकवे खुर्द होते. मुळशी तालुक्यातून बावधनची निवड केली आहे. पुरंदर तालुक्यातून धालेवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर काळदरी, तर तिसऱ्या क्रमांकावर पिंगोरी होते. शिरूर तालुक्यातून विठ्ठलवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर चिंचोली मोराची, तर तिसऱ्या क्रमांकावर न्हावरे होते. वेल्हा तालुक्यातून वेल्हे बुद्रुकची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर लव्ही बुद्रुक, तर तिसऱ्या क्रमांकावर सुरवड होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १३ गावे होणार ‘स्मार्ट व्हिलेज’
By admin | Published: April 18, 2017 2:47 AM