बारामती : बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्यात शनिवारी (दि २३) दुर्घटना घडली .यामध्ये कच्ची साखर तयार करताना ही दुर्घटना घडल्याचे समजते . पन मध्ये साखर तयार करताना तयार झालेल्या मिथेन वायूमुळे कामगारांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला. त्यामुळे १३ कामगार अत्यावस्थ झाले आहेत .यातील ९ कामगारांना बारामती येथील भाग्यजय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.माळेगाव कारखाना राज्यात अव्वल मानला जातो .सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्यात माळेगाव ची गणना होते .गेल्या पाच वर्षांपासून या कारखान्यावर राष्ट्रवादी विरोधी गटाची सत्ता होती .नुकताच राष्ट्रवादी ने हा कारखाना ताब्यात घेतला आहे .एक महिन्यापूर्वी कारखान्यात गळीत हंगाम संपला आहे .आज घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .घटना घडल्यानंतर कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले .संचालक योगेश जगताप , नितीन सातव , गुलाबराव देवकाते , राजेंद्र ढवाण , सतीश अटोले आदीनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान , तीन कामगारांची प्रक्रुती गंभीर आहे.त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .युवराज जनार्धन तावरे, घनश्याम हनुमंत निंबाळकर , प्रवीण हिरालाल वाघ , रामचंद्र सायबु येळे , सुनील हिराजी पाटील , जालिंदर भोसले , शिवाजी लक्ष्मण भोसले , बाळासो यशवंत ढमाळ , शशिकांत जागांन्नाथ जगताप , सुनील शिवाजी आरोडे , सोमनाथ कोंडीबा चव्हाण , शरद पांडुरंग तावरे , संजय हरिभाऊ गावडे अशी या घटनेतील जखमी कामगारांची नावे आहेत.
माळेगाव साखर कारखान्यात दुर्घटना, मिथेन वायू तयार झाल्याने १३ कामगार अत्यवस्थ; तिघांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:16 PM
माळेगाव कारखाना राज्यात अव्वल मानला जातो.सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्यात माळेगावची गणना होते.
ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांपासून या कारखान्यावर राष्ट्रवादी विरोधी गटाची होती सत्ता