पुणे : वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे. तरीही तरुणाई याबाबत गंभीर नाही. छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. देशात रक्तदाबामुळे रोज ३० वर्षांखालील १३०० तरुण मरण पावत आहेत.डॉ. एनास के. एनास यांच्या संशोधनातून हे वास्तव पुढे आले आहे. अनियमित जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी व व्यसनांचे वाढलेले प्रमाण, यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बैठे काम करण्याचे प्रमाण वाढले आहे, हे ही त्यामागील एक कारण आहे.पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध चांदोरकर म्हणाले, जगात रक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. दर सहाव्या माणसाला मधुमेह आढळतो. यामागे गोड खाण्याची परंपरा आहे. पोट वाढले की, रक्तदाब, मधुमेह वाढतो.अमेरिकेतील ‘कॅडी’ ही संस्था अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात संशोधन करीत आहे. संस्थेचे संचालक डॉ. इनास. के. एनास यांनी हे संशोधन करून ही आकडेवारी समोर आणली आहे. त्यांच्याकडे संशोधनाचा ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.>एकदा तंबाखू खाल्ला वा सिगारेट ओढली, तरी हार्ट अटॅकचा धोका असतो. २६ वर्षांच्या मुलीने पार्टीमध्ये सहज हुक्का ओढला, तर तिला हार्ट अटॅक आला. २३ वर्षांच्या मुलाने बीअर घेतली, त्यालाही हार्टअॅटॅक आला, अशी उदाहरणे आहेत. - डॉ. अनिरुद्ध चांदोरकर>संशोधनाचे आधारभारतातील जर्नल आॅफ ह्यूमन हायपरटेंशनच्या गेल्या काही वर्षांमधील रिसर्च पेपरचा अभ्यास.(गेल्या ५० वर्षांतील ट्रेंडची तपासणी)डायबेटिस टेक्नॉलॉजी थेरपेटिक्स, जाने. २०१२इंडियन जर्नल आॅफ मेडिकलरिसर्चचे काही वर्षांमधील संशोधनसंशोधक के. एस. रेड्डी यांच्या रिजनल केस स्टडीचा गेल्या काही वर्षांतील अभ्यास
देशात रक्तदाबामुळे रोज १,३०० तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 4:30 AM