पुणे : गेल्या वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे २६ प्राणांतिक अपघातांसह एकूण १३१ अपघात झाले आहेत. दर दोन ते तीन दिवसांना एक अपघात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. यात ठेकेदारांच्या बसच्या ९७ अपघातांची नोंद झाली आहे.पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या ११९२, तर भाडेतत्त्वावर ठेकेदारांमार्फत ८५३ बस चालविल्या जातात. मागील वर्षभरात पीएमपीच्या मालकीच्या बसचे ६ प्राणांतिक अपघातांसह ३४ अपघात झाले आहेत. तर, ठेकेदारांकडील बसचे २० प्राणांतिक अपघातांसह ९७ अपघात झाले आहेत. एकूण अपघातांची संख्या १३१ आहे. या आकडेवारीचा विचार केल्यास दर दोन ते तीन दिवसांना बसचा एक अपघात होत आहे.प्राणांतिक अपघातांची संख्या काही वर्षांपासून कमी झालेली नाही. बसची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याचे सातत्याने समोर येते. (प्रतिनिधी)
पीएमपीचे वर्षात १३१ अपघात
By admin | Published: April 27, 2017 5:00 AM