Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 06:33 PM2022-01-25T18:33:59+5:302022-01-25T18:34:08+5:30

पुण्यासाठी 2022 - 23 वर्षासाठी राज्यातील सर्वाधिक 750 कोटींच्या आराखड्यास मंजूरी

131 crore additional fund from District Planning Committee on the eve of elections | Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

Next

पुणे : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईत झालेल्या बैठकीत हा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. याशिवाय सन 2022-23 या आर्थिक वर्षांत राज्यातील सर्वाधिक तब्बल 750 कोटींच्या आराखड्यास देखील मंजूरी देण्यात आली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १३१ कोटींच्या वाढीव नियतव्ययास मंजूरी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा वार्षिक योजना 2022-23 ची  राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.  मंत्रालयातून ऑनलाईन झालेल्या या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पालक सचिव नितीन करीर, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, शासनाने निर्धारीत केलेल्या आर्थिक मर्यादेत वार्षिक आराखडा निश्चित करण्याची मर्यादा असल्याने इतर राज्यस्तरीय योजनांमधून काही कामे घेण्यात यावीत. महानगरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण लक्षात घेता अशा जिल्ह्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अतिरिक्त निधी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. प्राधान्यक्रमाने घ्यावयाच्या विकासकामांसाठी नियतव्ययाची मर्यादा ७५० कोटीपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वळसे-पाटील म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात स्थलांतरीत लोकसंख्या अधिक असल्याने आणि उद्योगही मोठ्या प्रमाणात असल्याने सुविधांवर ताण येतो. या शहरांमधून राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळतो. येथील रस्ते, पाणी पुरवठा आदी विविध सुविधांची आवश्यकता लक्षात घेता अतिरिक्त निधी देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यात प्राधान्यक्रमाने करावयाच्या विकासकामांसाठी ३२० कोटींची अतिरिक्त मागणी केली. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीने लघु पाटबंधारे योजना, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायतीला जनसुविधा, प्राथमिक शाळांची दुरूस्ती, इतर जिल्हा रस्त्यांचे मजबूतीकरण, वाडी-वस्ती विद्युतीकरण, यात्रास्थळ विकास, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम आदी विविध कामे प्राधान्यक्रमाने करावयाची आहेत. जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनांची माहितीदेखील त्यांनी यावेळी सादर केली. बैठकीला मंत्रालयातून आमदार अशोक पवार तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार चेतन तुपे, माधुरी मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी उपस्थित होते.

Web Title: 131 crore additional fund from District Planning Committee on the eve of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.