पुणे : शहरात बुधवारी १८२ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ४२७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरात १ हजार ५६४ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८९ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३१ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३४ लाख ९ हजार ४४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख १ हजार ९७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ९१ हजार ३६५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.