शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 7:31 AM

काही दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पुणे पोलिसांना निवडणूक नाकाबंदीदरम्यान सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. सोने वाहतुकीसाठी बनविलेल्या विशेष चारचाकी वाहनातून या दागिन्यांची वाहतूक केली जात होती. यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळमध्ये पावणेअठरा लाखांची रोकड जप्त केली. त्यानंतर शुक्रवारी हे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. संबंधित वाहन हे ट्रान्स्पोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित कोट्यवधींचे सोने कुठून आले, कुणाचे आहे? याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चार ठिकाणी तलवारी जप्त

धाराशिव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही एकाच दिवशी चार ठिकाणी घातक तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या तलवारी येताहेत कुठून, असा प्रश्न पडला आहे.

पनवेलजवळ कारवाई

पनवेल : पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर पोलिसांनी कारमधून ६ लाखांची रोकड जप्त केली.

पोलिसांनी पकडलेल्या वाहनांत शहरातील अनेक सराफा संस्थांचे दागिने आहेत. अनेक दागिन्यांसोबत अधिकृत इन्व्हॉइसदेखील आहेत. याबाबत जीएसटी विभागाला पूर्ण माहिती असते. दररोज ही गाडी ये-जा करणारी आहे. ही सिक्युअर्ड लॉजिस्टिक्स सर्व्हिस आहे. याद्वारे दररोज रोख अथवा सोन्याची ने-आण केली जाते. पोलिस प्रशासनासह निवडणूक आयोग आणि आयकर विभागाने त्यांचे काम जरूर करावे; फक्त व्यापाऱ्यांना काही तसदी पडणार नाही, याची काळजी घ्यावी.- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ ॲंड सन्स

हिंगोलीत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

हिंगोली : शहरात वाहनांची तपासणी करताना शुक्रवारी दोन कारमध्ये एकूण १ कोटी ४० लाखांची रोकड आढळली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. एका कारमध्ये १ कोटी २६ लाख ८८ हजार ५२० रुपये, तर दुसऱ्या कारमध्ये १३ लाख ५० हजार रुपये मिळाले. निवडणूक भरारी पथकही लगेच दाखल झाली. त्यांनी चालक अमित ओमप्रकाश हेडा (रा. हिंगोली) व गजानन माणिकराव काळे (रा. सोडेगाव) यांना विचारणा केली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

शिरूरला अठरा लाखांची रोकड जप्त

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराजवळील सतरा कमान पुलाजवळ तपासणी नाक्यावर एका व्यक्तीकडून १८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तपासणी नाक्यावर पोलिस पाहताच अज्ञात कारमधून उतरून पळणाऱ्या संशयितास पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले. हेमंत शर्मा (रा. कलीरामपाल मंडी, मथुरा), असे त्याचे नाव आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४GoldसोनंPoliceपोलिस