भाजी मंडई, व्यापारी बाजारपेठ, हॉटेल्स, सार्वजनिक कार्यक्रमाची ठिकाणे, बस स्टॉप, बँका, गावातील शासकीय कार्यालये आदी ठिकाणी नागरिकांनी नियमाचं पालन करून तसेच कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिल्यानंतर घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे व आणखी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मदत करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम व पोलिसांच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी केले आहे.
मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात मास्क वापरणे बंधनकारक असून ग्राहकाने तोंडावर मास्क लावलाय का नाही याची खात्री करूनच त्याला लागणारी वस्तू देण्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच सॅनिटायझर वापरून नागरिकांचे हात स्वच्छ करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना दिलेल्या लेखी नोटिसीमध्ये केले आहे.
उरुळी कांचन परिसरात आज अखेर ४७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.