ओतूर : ओतूर परिसरातील १९ गावांपैकी बुधवारी ओतूर शहरात ११ व उदापूर गावात ३, असे १४ नवीन रुग्ण सापडले आहे, त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ५०८ झाली आहे. आजपर्यंत २ हजार २८१ बरे झाले आहेत. सध्या ९८ जण कोविड सेंटरमध्ये, तर ३० जण घरीच उपचार घेत आहेत, तर ९९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी दिली.
बुधवारी ओतूर शहरात ११ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या १ हजार ११४ झाली आहे. १ हजार १९ बरे झाले आहेत ३७ जण कोविड सेंटर, तर २० जण घरीच उपचार घेत आहेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील २०५ बाधितांपैकी १८३ बरे झाले आहेत १५ जणांवर उपचार सुरू आहेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे ,असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.