शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध; आता 7 जागांसाठी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 8:12 PM

बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या...

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank Election) संचालक मंडळ निवडणुकीत संचालकांच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या. आता 7 जागासाठी 2 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विद्यमान संचालक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात , संजय काळे आप्पासाहेब जगदाळे विरोधकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले.तर आता खरी लढत हवेली, मुळशी आणी शिरूर तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटात होणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री व बहुतेक सर्व आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अधिक रंगत वाढली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 132 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 14 उमेदवार उरले आहेत.   शेवटच्या दिवशी तब्बल 52 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराने आज सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भरणे हे  सहाव्यांदा बँकेवर संचालक झाले आहे.

बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या. इंदापूर तालुक्यातून भाजप पुरस्कृत आप्पासाहेब जगदाळे हेदेखील बिनविरोध निवडून आले. जुन्नर मध्ये अखेरच्या क्षणी रघुनाथ लेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संजय काळे यांचा मार्ग मोकळा झाला. मावळमध्ये भोईरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन अर्ज अवैध ठरला होता  परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी देखील माघार घेतल्यामुळे मावळमधून ज्ञानोबा दाभाडे हे बिनविरोध निवडून आले.सहा आमदार बिनविरोध अशोक पवार यांना मात्र लढावे लागणार.. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये मंत्री राज्यमंत्री यांच्यासह सहा आमदार बिनविरोध निवडून आले परंतु शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना मात्र निवडणुकीमध्ये लढत द्यावी लागणार आहे त्यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार- बारामती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, आमदार संग्राम थोपटे -भोर, रमेश थोरात -दौंड, अप्पासाहेब जगदाळे -इंदापूर ,संजय काळे -जुन्नर, आमदार दिलीप मोहिते- खेड, ज्ञानोबा (माऊली) दाभाडे- मावळ ,आमदार संजय जगताप -पुरंदर, रेवणनाथ दारवटकर- वेल्हे ब वर्ग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर, अनुसूचीत जाती जमाती प्रवीण शिंदे हवेली, इतर मागास प्रवर्ग संभाजी होळकर बारामती, भटक्या विमुक्त जाती जमाती दत्तात्रय येळे, बारामती. यांचा समावेश आहेअशी होणार लढत.... 

हवेली तालुका- प्रकाश म्हस्के विकास दांगट मुळशी तालुका- आत्माराम कलाटे ,सुनील चांदेरे शिरूर तालुका- आमदार अशोक पवार, आबासाहेब गव्हाणे क वर्ग बँका पतसंस्था- प्रदिप विद्याधर कंद ,सुरेश घुले, दिलीप मुरकुटे.ड वर्ग-  दादासाहेब फराटे दिगंबर दुर्गाडे. महिला- (दोन जागा) आशाताई बुचके, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारbankबँकElectionनिवडणूकVotingमतदान