पुणे : शहरात बुधवारी १८९ कोरोनाबाधित आढळून आले असून, १४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार २३७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.२९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरात १ हजार ४४२ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २११ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ५९ हजार ८०७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ८४१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ३७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे.