प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्याची संख्या १५ टक्के असावी, असा आदेश दिला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच कार्यालयांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयात अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी येऊन काम करीत आहे. मग, ते यांत्रिक विभागातील कर्मचारी असो की प्रशासकीय की चालक-वाहक सर्वच कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणाने कार्यालयात येत आहे. यामुळे कोरोनाला कसा आळा बसणार, असा प्रश्न केला जात आहे.
राज्य सरकारने २३ एप्रिलला पत्रक काढून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्के असावी, असे कळविले. मात्र, पुण्यासह राज्यातील कोणत्याही आगारात अथवा विभागात याचे पालन होत नाही. कर्मचाऱ्यांची उपस्थिती हा सर्वच ठिकाणी आता चिंतेचा विषय असला, तरी एसटी प्रशासन ते गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून येत आहे.
चालक - वाहकांना हजेरी लावण्यासाठी बोलवले जात आहे. हजेरी नसेल तर पगार होणार नाही, असे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे कर्मचारी देखील भीतीने आगारात जमा होतात. कार्यशाळेत देखील हेच चित्र आहे. तिथे तर ५० टक्केपेक्षा जास्त उपस्थित आहे. कार्यालयांमध्ये देखील काम शिल्लक असल्याचे सांगून प्रशासकीय कर्मचारी कार्यालयात गर्दी करीत आहे.
चौकट 1
राज्य परिवहन महामंडळ दृष्टिक्षेपात
एकूण विभागीय कार्यालय : 31
एकूण आगार : 251
एकूण चालक : 37,000
एकूण वाहक : 36,000
एकूण यांत्रिक कर्मचारी : 18,000
प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी ; 12,000
चौकट 2
पुणे विभाग
एकूण आगार : 13
चालक : 1950.
वाहक : 1820.
यांत्रिक कर्मचारी : 950
प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी : 820
चौकट 3
कोरोनाची स्तिथी
एकूण बाधित : 7249 .
सध्या उपचार : 1491.
मृत्यू : 179 .
आर्थिक मदत : 8 कुटुंबाना मिळाली.
लसीकरण : 23 हजार
कोट : चालक - वाहकांना आम्ही एक दिवसाआड हजेरीसाठी बोलवितो. यांत्रिक कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू होत नाही. ते ही दोन शिफ्टमध्ये त्यांचे काम चालते. प्रशासकीय कार्यालयात मात्र १५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नाही.
रामकांत गायकवाड, विभाग नियंत्रक,पुणे.
--
कोट 2
कोरोना संसर्गाचा सर्वांत जास्त फटका चालक - वाहकांना बसला आहे. ते थेट प्रवाशांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना केवळ सह्या करण्यासाठी बोलविणे ठीक नाही. आता केवळ अत्यावश्यक सेवेतील गाड्या धावत आहे. त्यामुळे यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्याची संख्या कमी असणे गरजेचे आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक एसटी वर्कर्स संघटना, मुंबई.