हे सर्व बाधित या गावाजवळील एका मळ्यातील असून या ठिकाणी गुरुवारीही (दि.२१) ९ बाधित आढळून आले होते.तर (दि.२०) रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता.गावची तीन दिवसांत २५ रुग्ण संख्या झाली आहे.१४ दिवसांपूर्वी ही मंडळी येथील एका कुटुंबातील सोहळ्यासाठी पारनेर तालुक्यात गेली होती.तेथे आजारी असलेल्या नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी गावातील एक व्यक्ती गेली होती.त्या व्यक्तीला तेथून परतल्यावर खोकला,ताप आदी त्रास होऊ लागला.आता प्रशासन सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करत असून आणखीन बाधित वाढण्याची शक्यता आहे.येथील बाधितांना लेण्याद्री येथील कोविड सेन्टरमध्ये पाठविण्यात आले असून यापैकी बहुतांश व्यक्तींना फारशी लक्षणे नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.आटोक्यात आलेली तालुक्यातील रुग्णसंख्या दोन-तीन दिवसात पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.
१५ कोरोनाबाधित; मंगरूळ ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:03 AM