१४ नंबर येथील अनंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन सरपंच विक्रम भोर यांच्या अध्यक्षतेखाली अंजली मंगल कार्यालय नगदवाडी येथे पार पडली .
यावेळी नगदवाडी सोसायटीचे चेअरमन अशोक बढे , माजी उपसरपंच शांताराम घाडगे, हरिभाऊ भोर, संकेत बढे, नवनाथ नेंद्रे, दिनकर बढे, रत्नाकर जगताप, गोविंद बढे, शामराव बढे, अजाबा भोर, अंकुश भोर, सुरेश बढे, शहाजी काळे, शांताराम गावडे, काशिनाथ शिंदे, नामदेव गुंजाळ, निवृत्ती बढे, संपत बढे यांच्यासह संचालक हनुमंत भोर, अंकुश भोर, विजय भोर, देवराम भोर, महादेव फुलसुंदर, उत्तम शिंदे, रामदास भोर, मनिषा कुतळ, कर्मचारी , सभासद उपस्थित होते.
सन २०१९-२० या सालातील अहवालाचे वाचन व्यवस्थापक राजेंद्र भोर यांनी केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या चर्चेत कारभारी भोर यांच्यासह अनेक सभासदांनी सहभाग घेतला तर शांताराम घाडगे, अंकुश भोर, निवृत्ती बढे , पोपट बढे यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रशिक्षक एम. एम. तांबोळी यांनी सभासदांना सहकार कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
विक्रम भोर म्हणाले की , एक हजार ५९ सभासद असणाऱ्या संस्थेत ८ कोटी ठेवी असून संस्थेने ७ कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेला २४ लाख १४ हजार रुपये अहवाल सालात नफा झालेला आहे. सभासदांनी वेळेवर कर्ज परतफेड करून संस्थेस सहकार्य करावे. संस्थे मार्फत राबविण्यात आलेल्या वीजबिल भरणा केंद्र, सोनेतारण कर्ज, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस इत्यादी विविध सेवांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
व्यवस्थापक राजेंद्र भोर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार खजिनदार अशोक बढे यांनी मानले.
२७ नारायणगाव
ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन विक्रम भोर.