पुणे : मुंबई येथील मंत्रालयात कनिष्ठ,वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देतो,असे आमिष दाखवून पुण्यातील तीन जणांची तब्बल १५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आण्णासाहेब रामचंद्र राठोड (रा. दीपकनगर तांडा, उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत सुखसागर नगर येथील ४८ वर्षाच्या व्यावसायिक महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार मे २०२१ ते १५ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादींचा मसाले आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे आपल्या या व्यवसायाची जाहिरात केली होती. मसाला ऑर्डरच्या निमित्ताने फिर्यादी यांचा राठोड सोबत परिचय झाला होता. मंत्रालयात नोकरी लावताे असे सांगून फिर्यादीची मुलगी व त्यांच्या ओळखीचे इतर दोघे अशा तिघांकडून तब्बल १४ लाख ७७ हजार रुपये घेतले. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.