पुणे : गर्दी, ढोल-ताशांचा आवाज यांचा फायदा घेत पुण्यातील चोरांनी चांगलेच हात साफ करून घेतले आहेत. टिळक चौकात अवघ्या दोन तासांमध्ये तब्बल १५ मोबाईल फोन लंपास केले असल्याने नागरिकांना वारंवार सावधानतेचा इशारा देण्यात होता.
गर्दीचा फायदा साधून मोबाईल, पर्स, पाकीट चोरीला जाण्याच्या घटना दरवर्षीप्रमाणे यंदाही होत असून त्यांचा आकडा वाढत जाताना दिसत आहे. या चोऱ्यांची पूर्ण आकडेवारी समजली नसली तरी प्रत्येक पोलीस चौकीवर या तक्रारी नोंदवण्याचे काम सुरु आहे. मिरवणूक मार्गावर शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे आणि हजारो पोलीस तैनात असतानाही गर्दीची संधी साधून अलगदपणे फोन काढून घेण्यात येत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.