शनिवारी ओतूर शहरात ८ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या १ हजार ९३ झाली आहे, पैकी ९९८ बरे झाले आहेत, ३४ जण कोविड सेंटर, तर २३ जण घरीच उपचार घेत आहेत, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
डिंगोरे येथील ३ नवीन रुग्णांमुळे तेथील बाधितांची संख्या २५४ झाली असून पैकी २३५ बरे झाले आहेत. ७ जणावर उपचार सुरू केले आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
धोलवड येथे ४ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या १३३ झाली आहे. ११४ बरेझाले आहेत. १४ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ. सारोक्ते म्हणाले.
मागील आठवड्यापासून ओतूर, डिंगोरे, धोलवड, उदापूर, हिवरे खुर्द येथे सातत्याने रुग्ण सापडत आहेत. ओतूर शहरात शेजारच्या गावातील लोक येतात जे घरीच उपचार घेत आहेत, त्यामुळे संसर्ग वाढतो असे डॉक्टर सारोक्ते व डॉ. यादव शेखरे म्हणाले.