राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पुर्व भागातील लोणकरवाडी येथे १५ मोरांचा तडकाफडकी मूत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मुत्यू उष्माघाताने झाला की, विषबाधेने झाला यांचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने या मोरांचा मूत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालूक्याच्या पुर्व भागातील दावडी परिसरातील लोणकरवाडी येथे मोरांचा मुत्यू झाल्याची घटना शनिवारी दि १६ रोजी उघडकीस आली. उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. दावडी परिसरातील डोंगर परिसरात शेकडो मोर आहे. आज ( दि १७ ) रोजी सकाळी काही मोर तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दावडीचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष लोणकर व ग्रामस्थांनी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मूत्यू झाला होता.
तडफडणाऱ्या ४ मोरांना पाणी पाजुन जीवदान दिले. खेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फाफाळे, वनरक्षक सुषमा चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन मुत्युमुखी पडलेले मोरांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानंतर मोरांच्या मुत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोरांना पिण्यासाठी पाणी आहे.विषबाधा झाल्याने त्यांचा मूत्यू झाला असावा अशी शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली. या डोंगर परिसरात अजुन काही मोर मुत्यूमुखी पडल्याचे आढळून येत असून मोरांच्या मूत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे व ग्रामस्थांनी सांगितले.