करडे-निमोणे रस्त्यावर प्लॉटिंग केलेले असून या प्लॉटिंगच्या चारही बाजूने लोखंडी तारांचे कंपाउंड आहे. या कंपाउंडच्या शेजारीच विजेचा खांब आहे. दिवसभर पाऊस चालू असल्याने या खांबावरील विद्युत प्रवाह ताणामध्ये उतरला. तोच प्रवाह कपाऊंडच्या तारांमध्ये उतरला. या परिसरात मेंढ्या चाऱ्याच्या शोधात आल्या असता काही मेंढ्याना विजेचा धक्का बसला. या अपघातात १५ मोठ्या मेंढ्या व दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
शिरूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गोरख सातकर आणि डॉ. नवनाथ पडवळ यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली
या घटनेने कोळेकर सह अन्य मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. "विजेच्या खांबाच्या शेजारी तारेचे कंपाउंड असल्याने विजेचा प्रवाह तारेत उतरल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित मेंढपाळाला शासनाकडून शक्य तेवढी मदत केली जाईल. "
बाळासाहेब टेंगले - उपअभियंता वीजवितरण कंपनी