पिंपरी: शिवीगाळ का केली, अशी विचारणा केल्याने महिलेला व तिच्या भावाला मारहाण केली. तसेच महिलेच्या १५ वर्षीय मुलीच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले. मोरेवस्ती चिखली येथे रविवारी (दि. २१) ही घटना घडली.
संजिता राकेश त्रिपाठी (वय ३४, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली आहे. संतोष चोरगे (वय ४०), दीपक चोरगे (वय ३६, दोन्ही रा. मोरे वस्ती, चिखली), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजिता व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संजिता चिंचेच्या मळ्यामधी एका मेसमध्ये चपाती करायला जातात. काही एक कारण नसताना आरोपींनी मेसमध्ये जाऊन संजिता यांना शिवीगाळ केली होती. याबाबत त्यांनी आरोपीच्या पत्नीकडे विचारणा केली. तुझा नवऱ्याने माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन का शिव्या दिल्या, असे फिर्यादीने विचारले. त्यामुळे दोन्ही आरोपींनी संजिता आणि त्यांच्या भावाला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांची मुलगी वर्षा हिच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले.