याप्रकरणी किरण अजिनाथ गायकवाड (वय २९, रा. मिलिंदनगर, जि. अहमदनगर) व मौलाना सत्तार शेख (वय २७, रा. तौनेश्वर रोड, हडोळा, जि. अहमदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, साकराबाई आबा पवार व अंबिका साहेबराव गायकवाड, (रा. ढोकसांगवी, परीटवाडी, ता. शिरूर) ह्या दोन महिला आरोपी फरार आहेत.
यातील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपीना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीना शुक्रवारपर्यंत, दि. २७ पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी फिर्याद दिल्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी, दि. २४ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका कारमधून(क्र. एमएच १२ एफयू ५५३६) मधून परीटवाडी, ढोकसांगवी गावच्या हद्दीत गांजा येणार असल्याची माहिती रांजणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी करत हे वाहन पकडले. त्यात २ किलो वजनाचे ७३ गांजाचे बॉक्स पकडले. तर या गुन्ह्यात वापरलेली कार असा पोलिसांनी एकूण ३५ लाख ५४ हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
250821\1921-img-20210825-wa0034.jpg
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवहितीन
रांजणगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक आरोपी व पोलिस पथक