या वेळी तहसीलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, संजय गांधी योजना नायब तहसीलदार महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनील बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, नीलेश मदने, अशोकराव इंगुले आदी उपस्थित होते.
सभेमध्ये एकूण १७४ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेचे १०८ प्राप्त अर्जापैकी १०२ मंजूर, तर ६ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ५० प्राप्त अर्जांपैकी ३८ अर्ज मंजूर, तर १२ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेच्या प्राप्त ६ अर्जापैकी ६ अर्ज मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजनेचे १० प्राप्त अर्जापैकी ८ अर्ज मंजूर, तर २ नामंजूर करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय कुटुंब योजनेखालील ३ लाभार्थ्यांस धनादेश वाटप करण्यात आले.
----------------------------