ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील १९ गावांपैकी मंगळवारी ७ गावांत १६ रुग्ण सापडले आहेत. या १६ रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ४९४ झाली आहे. यांपैकी २ हजार २७७ बरे झाले आहेत. ८८ जण कोविड सेंटर तर ३० जण घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. यादव शेखरे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या वतीने दिली.
मंगळवारी डिंगोरे, उदापूर, तेजेवाडी येथे एक एक, धोलवड ४, ओतूर ३, बल्लाळवाडी ४, ठिकेकरवाडी २ असे १६ नवीन रुग्ण सापडले आहेत.
डिंगोरे येथील २५६ पैकी २३५ बरे झाले आहेत. ९ जण उपचार घेत आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे .
धोलवड येथील १३७ पैकी ११८ बरे झाले आहेत १४जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार १०३ झाली आहे.