जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी फक्त १६ हजार ९८२ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १८० रुपये ते २०१ रुपये बाजारभाव मिळाला. याच कांद्यास गुरुवारी जो भाव मिळाला त्या भावात सरासरी १० रुपयांची घसरण झाली आहे. गेले काही दिवसांनी बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे ओतूर मार्केटचे कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव :
कांदा नं. १ (गोळा)--१८० रुपये ते २०१ रुपये .
कांदा नं. २ - (सुपर कांदा)--१५० रुपये ते १८० रुपये .
कांदा नं. ३--(गोल्टा ) -९० रुपये ते १५० रुपये ।
कांदा नं. ४--( गोलटी / बदला) -३० रुपये ते ९० रुपये.