तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १६ गावातील पिण्याच्या पाण्याच्या ११४ स्रोतांमधील पाणी नमुन्यांपैकी तब्बल ६७ पाण्याचे नमणे दूषित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे व डॉ. प्रवीण शिंदे यांनी दिली. गेल्या दहा महिन्यांमध्ये पाठविलेल्या सातत्याने हा पाण्याचे नमुने पुण्यातील राज्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये हे पाणी दूषित असल्याचा अहवालत्यांनी दिला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे अंतर्गत येणाऱ्या सोळा गावांना विषयुक्त पाणीपुरवठा होतो, हेच जणू याद्वारे सिद्ध झाले आहे.शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या १६ गावांची लोकसंख्या साधारण १ लाख ८ हजार ५३० आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच शेतामध्ये वापरल्या जाणाºया रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बहुतांश गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सध्या दूषित झाले आहेत. त्यामुळे या लाखभर लोकांनाहेच विषयुक्त पाणी पुरवले जात आहे.सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे मिळत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये फिल्टरचे पाणी विकत घेऊन नागरिक आपली तहान भागवत आहेत. सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे विकतच्या पिण्याच्या पाण्याला मोठी मागणी वाढल्याचे दिसून येते. २० लिटरचे कॅन पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत विकले जात आहे.गावोगावी फिल्टर पाण्याचे प्लांट उभे असून पिण्याचे पाणी विकण्याचे व्यवसाय सुरू झालेले आहेत.तळेगाव ढमढेरे प्राथमिकआरोग्य केंद्रांतर्गत सोळागावांचा समावेश आहे.>११४ पाण्याचा स्त्रोतांची झाली तपासणीतळेगाव ढमढेरे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत ११४ आहेत.एप्रिल २०१८ पासून जानेवारी २०१८ पर्यंत या सोळा गावातील ४०६ जैविक पाण्याचे नमुने राज्य प्रयोगशाळा पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यापैकी ६७ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे.दूषित पाण्याचा नमुना आढळलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने कोंढापुरी, विठ्ठलवाडी, दरेकरवाडी, शिक्रापूर या गावांचा सामावेश आहे.>पाण्याचे स्रोत जिओ फिनिशिंग पंपद्वारे पाणी नमुने प्रत्यक्ष आॅनलाइन घेऊन पुढे तपासणीसाठी पाठविले जातात यूआयडी नंबरमुळे पाणी नमुने तपासणी पारदर्शकता दिसून येते. या याचा उपयोग २०१७ पासून केला जात आहे. त्यामुळे पाणी नमुना त्याच स्रोताचा आहे याची खात्री होते. रिपोर्ट योग्य पद्धतीने तपासणी होऊन खात्रीपूर्वक मिळतो.-डॉ. प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, तळेगाव ढमढेरे>ज्या गावचा पाण्याच्या स्रोताचा नमुना दूषित आलेला आहे,अशा ग्रामपंचायतीला प्राथमिक आरोग्य केद्राच्या वतीने लेखी सूचना दिल्या जातात. ग्रामपंचायत योग्य ती कार्यवाही करून पुन्हा तपासणीसाठी पाणी नमुना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठवला जातो.- जे. जी. मारणे, आरोग्य सहायक प्रा. आ. केंद्र,तळेगाव ढमढेरे
सोळा गावांना विषयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 1:45 AM