प्रभात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या प्रथमेशला खगोलशास्त्रामध्ये विशेष रस आहे. खगोलशास्त्रातील सर्वात जुनी संस्था असलेल्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा तो सदस्य आणि स्वयंसेवक आहे. छायाचित्राविषयी प्रथमेश म्हणाला, काही अभ्यासपूर्ण लेख आणि यू ट्यूबवरील काही व्हिडिओ पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली होती. मी चंद्राचे एकच छायाचित्र काढू शकलो असतो. पण त्याच्या ५० हजार इमेज काढल्या. आपण कुठलेही छायाचित्र पाहताना ते झूम करतो तेव्हा ते ब्लर किंवा पिक्सिलाईट होते. ते टाळण्यासाठी चंद्राच्या विविध भागांची छायाचित्रे टिपली. जसा आपण मोबाइलमध्ये ‘पॅनोरमा’ काढतो, तसाच मी चंद्राचा पॅनोरमा काढला. चंद्राच्या छोट्या भागाला झूम करून त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर छोट्या छोट्या भागांचे व्हिडिओ काढले, त्यातून छायाचित्र मिळाली. एका व्हिडिओमधून तब्बल २००० हजार छायाचित्रे मिळाली. या माध्यमातून जवळपास ३८ व्हिडिओ काढले. मग एक व्हिडिओ घेऊन तो प्रोसेस केला आणि त्यातून एक छायाचित्र तयार केले. ३८ छायाचित्र काढल्यानंतर मग ती एकमेकांमध्ये मिक्स करत गेलो. सर्व इमेज जोडल्यानंतर एक छायाचित्र तयार केले. भारतात अजून तरी अशा पद्धतीने कुणी छायाचित्र काढले नसल्याचा दावाही त्याने केला.
लॉस एंजलिस येथील एका विद्यापीठातील तरुण मुनर सरफेसवर पीएचडी करीत आहे. त्याने हे छायाचित्र मला मिळेल का, अशी मागणी केली. त्याला छायाचित्र पाठविल्यानंतर प्रबंधासाठी त्याचा खूप उपयोग झाला असल्याचे प्रथमेशने अभिमानाने सांगितले.
---------------------------------------------
अॅस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करण्याची इच्छा
खगोलशास्त्राची विशेष आवड असल्याने अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉफिजिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. चंद्राचेच छायाचित्र परत काढायचे आहे. पण यासाठी वेळ आणि मुबलक डाटा असायला हवा. पुढील काळात आकाशगंगेतील विविध ग्रह, ताऱ्यांची छायाचित्र काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी हिमालयात जाणार असल्याचे प्रथमेशने सांगितले.
--------------------------