पुणे : विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत ५१ निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत ११० अशी १६१ निवारागृहे सुरु करण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये एकूण ३७ हजार ६२९ कामगार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. पुणे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या ५१ निवारागृहांमध्ये एकूण ३ हजार ४१३ विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण ३४ हजार २१६ कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत ३४१३ कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत ८८ हजार ४९६ कामगारांना अशा एकूण ९१ हजार ९०९ कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय व पुणे महानगर पालिका हद्दीतील २० शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणाऱ्या आहेत. सोशल डिस्ट्नसिंगचा (सामाजिक शिष्टाचार) अवलंब करुन एका खोलीत सात किंवा आठ जणांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत दोन वेळा चहा, नाश्ता तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटाइझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.पुणे महानगरपालिकेच्या वा.ब.गोगटे विद्यालय निवारा केंद्र, नारायण पेठ, पुणे येथे एकूण ८१ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये १ नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव महेंद्र काडाईत आहे. याशिवाय परराज्यातील १६ व्यक्ती तर महाराष्ट्रातील 64 व्यक्ती आहेत.पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेंतर्गत रात्र निवारा प्रकल्प, सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ, पुणे येथे एकूण १२ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये 1 नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव देवजा असे आहे. परराज्यातील 2 व्यक्ती तर महाराष्?ट्रातील 9 व्यक्ती आहेत.पुणे महानगरपालिकेचे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण 37 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील ५ व्यक्ती तर महाराष्ट्रातील 32 व्यक्ती आहेत. पुणे महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रशाला निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण ४९ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील 14 तर महाराष्ट्रातील 35 व्यक्ती आहेत.
पुणे जिल्ह्यात कामगारासाठी १६१ निवारागृहे सुरु ; बेघरांसाठी साखर कारखान्यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 6:34 PM
५१ निवारागृहांमध्ये एकूण ३ हजार ४१३ विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण ३४ हजार २१६ कामगार वास्तव्यास
ठळक मुद्देविविध ठेकेदारांमार्फत ८८ हजार ४९६ कामगारांना अशा एकूण ९१ हजार ९०९ कामगारांना भोजनाची सुविधा