पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी व नीरा येथील शासकीय लॅबमध्ये ३५९ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ७२, जेजुरी १७ असे शहरी भागातच ८९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तालुक्यातील १५६ व तालुक्याबाहेरील ९ व्यक्तींचा समावेश आहे.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये गुरुवारी २७९ संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. पैकी १२३ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहर ७२, ग्रामीण भागातील भिवडी १०, टेकवडी ६, सोनोरी ५, माळशिरस ३, वनपुरी, गुरोळी, पवारवाडी प्रत्येकाला २, सिंगापूर, पांडेश्वर, नाझरे, पिसर्वे, सुपे, कोडीत, गराडे, शिवरी, बोपगाव, खळद, हिवरे, नाझरे (क.प), परिंचे, राजेवाडी, दिवे, चांबळी प्रत्येकी १, असे ग्रामीण भागातील ४६, तर तालुक्याबाहेरील ५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ५८ व्यक्तींच्या कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी ३७ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी १७, नाझरे, २, कोथळे, वाल्हा, शिवरी, मावडी, लवथळेश्वर, दौंडज, घाटेवाडी, लवथळेश्वर, जेऊर, कोळविहिरे, थोपटेवाडी, धालेवाडी, मुर्टी, खळद प्रत्येकी १ असे १६ तर तालुक्याबाहेरील मोरगाव व बारामती येथील प्रत्येकी २ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. नीरा, पिंपरे (खुर्द) प्रत्येकी २ तर पिसुर्डी १ असे ५ अहवाल बाधित आले आहेत.