पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२०० झाली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रूग्णसंंख्येत १६९ ने वाढ झाली. विभागात एकूण ७७ जण आतापर्यंत कोरोनाने मरण पावले आहेत. आज १२ जणांचा मृत्यू झाला.आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची विभागातील.संख्या १८४ आहे. अॅक्टीव रुग्ण ९३९ आहेत. ४२ रुग्णांची प्रक्रुती गंभीर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. आजपर्यंत पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा , सांगली, कोल्हापूर , सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एकूण १३ हजार ६९३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी१३ हजार ७० चा अहवाल मिळाला. ६२३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मिळालेल्या अहवालांपैकी ११ हजार ८१२ नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून १ हजार २०० चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागामधील ५१ लाख ३६ हजार ८४५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यामध्ये १ कोटी ९८ लाख १४ हजार ६३९ व्यक्तींची तपासणी केली गेली. त्यापैकी १०६७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.
पुणे: १०९४ बाधित, मृत्यू - ७१
सातारा: २६ बाधित, मृत्यू- २
सोलापूर ४२ बाधित मृत्यू -३
सांगली २८ बाधित, मृत्यू- १.
कोल्हापूर १० बाधित, मृत्यू- ०