पुरंदर तालुक्यात शुक्रवारी एप्रिल रोजी दिवसभरात ५०२ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १७१ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहरांमधील ७२, जेजुरी शहरांमधील १४ या दोन्ही शहरांमधील ८६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये शुक्रवार दिवसभरात ३२२ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १२१ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहरांमधील ७२, पिसर्वे ५, सोनोरी ४, झेंडेवाडी, दिवे, राख, काळेवाडी येथील प्रत्येकी ३, भिवरी, पारगाव, गराडे, सोमर्डी, हिवरे, शिवरी येथील प्रत्येकी २, खळद, वाघापूर, गुरूळी, साकुर्डे, नायगाव, वीर, वनपुरी, मांढर, उदाचीवाडी, सिंगापूर, कोडीत, आंबळे, राजूरी, चांबळी, पिंपळे येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील १ असे एकूण १२१ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये शुक्रवार (दि. १६) घेण्यात आलेल्या १३० संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ४७ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी येथील १४, भोसलेवाडी ५, वाल्हे, कोळविहीरे, साकुर्डे प्रत्येकी ३, मावडी सुपा, आडाचीवाडी प्रत्येकी २, वीर, नावळी, पिंगोरी, पिंपरे (खुर्द), धालेवाडी, वाळुंज, बेलसर, रानमळा, नीरा येथील प्रत्येकी १, तसेच तालुक्याबाहेरील निंबुत, वाकी, मोरगाव, मुर्टी, जोगवडी येथील प्रत्येकी १ असे एकूण ४७ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी ५० संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ३ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. आडाचीवाडी, गायकवाडमळा, नीरा येथील प्रत्येकी १ असे ३ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.