शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

डिसेंबरमध्ये मद्यविक्रीतून राज्याला १७२ कोटी!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:40 AM

महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीबंदीमुळे गेले वर्ष गाजले. अर्थातच मद्यविक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मद्याचा खप सुमारे ६५ लाख लीटरने कमी झाला होता.

पुणे - महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीबंदीमुळे गेले वर्ष गाजले. अर्थातच मद्यविक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मद्याचा खप सुमारे ६५ लाख लीटरने कमी झाला होता.डिसेंबर महिन्यात मद्यविक्री वाढून तब्बल १७२.६१ कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाल्याने गेल्या वर्षीची सरासरी गाठू, असे राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.मद्यविक्रीतून आॅगस्ट २०१६मध्ये ११६.५६, तर आॅक्टोबरमध्ये १३५.५७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले.त्या तुलनेत आॅगस्ट २०१७मध्ये ८७.६६ आणि आॅक्टोबरमध्ये १२८.८४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. म्हणजेच आॅगस्ट, आॅक्टोबर २०१७मध्ये अनुक्रमे २८.९० आणि ६.७२ कोटी रुपयांची तूट नोंदविण्यात आली.मद्यविक्रीचे एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ अखेरचे आकडे पाहिल्यास, ६४.३६ लाख लीटर देशी दारू, बीअर आणि इतर मद्याचा खप कमी झाला आहे.देशी मद्याच्या खपात १२.६३ टक्के, विदेशी मद्याच्या खपात१३.७२ टक्के आणि बीअरच्या खपामध्ये २९.७२ टक्के घट नोव्हेंबरपर्यंत नोंदविण्यात आली आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक सुनील फुलपगार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र