पुणे : शहरात मंगळवारी १५८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९०१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.६७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरात १ हजार ३९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८३ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २१२ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ५१ हजार ५७० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ६५२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार २३१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.