पुरंदर तालुक्यात गुरुवार (दि.२९) ५१० संशयीत रुग्णांची अँटीजेन कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी १७७ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. बुधवार (दि.२८) जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये २८ संशयीत रुग्णांचे आर.टी - पी.सी.आर सॅब घेण्यात आले होते. यांचा प्रलंबित अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, यामध्ये ८ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यात गुरुवार (दि.२९) १८५ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये ३०१ संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी १०६ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड शहरांमधील ४० तसेच ग्रामीण भागातील ६६ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड ४०, वाघापूर ११, पिसर्वे ८, पारगाव ६, केतकावळे ५, चांबळी, सुपे ३, खानवडी, खळद, दवनेवाडी, एखतपूर, सोनोरी, सोमर्डी, पिसे, उदाचीवाडी येथील प्रत्येकी २, भिवरी, गराडे, माळशिरस, ढुमेवाडी, कोडीत, माहूर, परिंचे, अंबोडी, कुंभारवळण, पानवडी, हिवरे, झेंडेवाडी, मासळवाडी, वीर येथील प्रत्येकी १ असे एकूण १०६ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये १३४ संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी ४९ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. जेजुरी येथील १५, कोळविहिरे ६, बेलसर ४, नायगाव, नावळी, नीरा, पिंपरे येथील प्रत्येकी २, भोसलेवाडी, दौंडज, मावडी क.प, नाझरे क.प, पिसुर्टी, राख, साकुर्डे येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मुर्टी ४, मोरगाव २, सुपा १, काऱ्हाटी , कोपर्डी (सातारा) असे एकूण ४९ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये बुधवारी (दि. २८) २८ संशयीत रुग्णांचे आर.टी- पी.सी.आर. सॅब घेण्यात आले होते. यांचे प्रलंबित अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, यामधील ८ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी येथील ३, भोसलेवाडी, जवळअर्जुन, गुळुंचे, टेकवडी, भोरवाडी येथील प्रत्येकी १ असे एकूण ८ रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ संशयीतांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी १६ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. राख ६, गुळुंचे ४, पिंपरे (खुर्द) २, बारामती तालुक्यातील निंबुत २ व गरदडवाडी २ असे तालुक्यातील १२ तर तालुक्या बाहेरच्या ४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२ संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. पिसुर्टी ३, वाल्हे २, गुळुंचे १ असे एकूण ६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.