पुणे : मागील अडीच महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकून पडलेले १८० हून अधिक महाराष्ट्रीयन बांधव रविवारी (दि. १४) मायदेशी परतले. दुबई येथून विशेष विमानाने पुणेविमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. सात दिवसांनंतर तपासणी करून त्यांना घरी पाठविले जाणार आहे.कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकून पडले. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत मिशन घेण्यात आले. त्यानुसार विविध देशांतून विशेष विमानाने त्यांना परत आणले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत. त्यामध्ये नोकरदार, कामगार तसेच पर्यटकांचाही समावेश आहे. त्यात महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश होता. त्यांना परत आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुळचे पुण्याचे असलेले दुबई येथील जीएमबीएफ ग्लोबल संस्थेचे उपाध्यक्ष राहुल तुळपुळे व शारजा येथील धनश्री वाघ पाटील यांनी प्रयत्न करत होते. त्यांनी महाराष्ट्रात येऊ इच्छिणारे नागरिक, परराष्ट्र मंत्रालय शासनाशी समन्वय साधून परतीया मार्ग मोकळा केला.शनिवारी (दि. १३) जवळपास १९० नागरिक मुंबई विमानतळावर उतरले. तर रविवारी १८० हून अधिक नागरिक विशेष विमानाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरले. तिथे सर्वांचे थर्मल स्क्रिनींग करण्यात आले. त्यांना पुढील सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. प्रशासनाकडून त्यांना हॉटेलपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सात दिवसांनी तपासणी करून घरी सोडण्यात येईल. त्यानंतरचे पुढील सात दिवस ते होम क्वारंटाईन असतील.-----------मी अबुधाबीमध्ये होते. महाराष्ट्रात परत येण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेकांना परत यायचे होते. राहूल तुळपुळे व धनश्री पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला. पुढील १४ दिवस सर्व जण क्वारंटाईन असतील.- भक्ती गायकवाड, प्रवासी
केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आखाती देशांतून १८० महाराष्ट्रीयन पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:25 PM
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत..
ठळक मुद्देअडीच महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेले १८० हून अधिक महाराष्ट्रीयन मायदेशीपुढील सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार ; तपासणी करून घरी पाठविले जाणार