शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पुणे जिल्ह्यातील 18 हजार गरोदर माता अनुदानापासून वंचित; 'असे' दिले जाते अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 5:27 PM

अनुदान न मिळणाऱ्या महिलांचे सरासरी प्रमाण 10 ते 12 टक्के एवढे

ठळक मुद्देतीन वर्षांत 1 लाख 62 हजार मातांना 68 कोटी 74 लाखांचे वाटप जिल्ह्यात गरोदर महिलांना शासनाकडून दिले जाते 5 हजार रुपयांचे अनुदान

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे :  पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 18 हजार 641 गरोदर माता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांत तब्बल 1 लाख 62 हजार 647 मातांना 68 कोटी 74 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. अनुदान न मिळणाऱ्या महिलांचे सरासरी प्रमाण 10 ते 12 टक्के एवढे आहे. 

शहरी व ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर माताना पुरेसा पोषण आहार मिळावा व आणि किमान उपाचारासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत गरोदर महिलेला तीन टप्प्यात 5 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते. पुणे जिल्ह्यात सन 2017 ते डिसेंबर 2020 पर्यंत 1 लाख 62 हजार 647 गरोदर महिलांची नोंदणी करण्यात आली. परंतु विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्याने, आधार अपटेड नसल्याने, बँक खाते बंद असणे, स्वत: चे बँक खाते नसणे, पतीच्या नावाचे बँख खाते अशा अनेक तांत्रिक अडचणीमुळे हजारो महिला पात्र असून देखील,  अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. ------ तालुकानिहाय माहिती तालुका      लाभार्थी महिला     अनुदान (लाखात)आंबेगाव      5137                  2.96बारामती      9000                  3 92भोर             3834                 1.93दौंड             7941                  3.86हवेली          21874               10.22इंदापूर          8844                   3.95जुन्नर            6540                  3.39खेड              8539                  3.71मावळ            7405                3.31मुळशी            4506                2.10पुरंदर              5166                2.19शिरूर              9409                4.26वेल्हा                761                  0.29पुणे शहर         35758              12.67पिंपरी चिंचवड  27933             9.93एकूण               162647          68.74--------असे दिले जाते अनुदान प्रत्येक नोंदणीकृत व पात्र लाभार्थी महिलेला शासनाकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यात पहिला हप्ता 1 हजार रुपये नोंदणी केल्यानंतर 150 दिवसाच्या आता दिला जातो. त्यानंतर दुसरा हप्ता सहा महिने पूर्ण झाल्यावर तर तिसरा दोन हजार रुपयांचा हप्ता बाळाचा जन्म झाल्यावर दिला जातो. -------शंभर टक्के लाभासाठी महिलांनी स्वत:चे बँक खाते व आधार अपटेड करावे जिल्ह्यात गरोदर महिलांना शासनाकडून 5 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना अनुदान देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. परंतु अनेक महिलांचे स्वत: चे नावे बँक खाते नसल्याने व आधार अपटेड नसल्याने अनुदानापासून वंचित राहत आहेत. - डाॅ.भगवान पवार,  जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिलाGovernmentसरकार