आज सलग चौथ्यादिवशी ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
सासवड येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये ३४२ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ११६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहरामधील ५२, तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड ५२, पिसर्वे १४, केतकावळे ५, शिवरी ४, पिंपळे, यादववाडी, परिंचे, पारगाव, वाघापूर, हिवरे, काळेवाडी, झेंडेवाडी, चांबळी, दिवे येथील प्रत्येकी २, राजेवाडी, गुरूळी बेलसर, जेजुरी, काळदरी, भिवरी, टेकवडी, आस्करवाडी, सोनोरी, भिवडी, कोडीत, सुपा, आंबळे, माळशिरस, रिसे, पोढें, पानवडी, वीर, एखतपूर, पठारवाडी, मुंजवडी येथील प्रत्येकी १ असे एकूण ११६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये १५० संशयित रुग्णांची कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी ६९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. जेजुरी शहर १५, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. नाझरे, पिसर्वे ६, पिंपरे खुर्द ५, वाल्हे, निळूंज, पिंपरी प्रत्येकी ४, भोरवाडी ३, जेऊर, सुपे २,भोसलेवाडी, गुळूंचे, मावडी, रानमळा, धालेवाडी, नीरा, कर्नलवाडी, मांडकी, पिसुर्टी येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मुर्टी ३, मोराळवाडी २, मोराळे १ असे एकूण ६९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
-