पुरंदरच्या ग्रामीण भागातील आता एकाही गावामध्ये बुधवारी (दि २२) १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय नाहीत. सासवड व जेजुरी नगरपालिका कार्यक्षेत्र ही दोनच शहरे आता कोरोनाची हॉटस्पॉट असल्याचे आरोग्य विभागाने ‘ लोकमत’ला सांगितले. तालुक्यातील शिवरी गावात ९ रुग्ण, नीरा, पारगाव, दिवे, वीर, गुळुंचे गावात प्रत्येकी ७ रुग्ण, परिंचे गावात ६ रुग्ण, बेलसर, सिंगापूर, पिंपळे गावात ५ रुग्ण, ढालेवाडी, कोळविहिरे, माळशिरस, माहूर प्रत्येकी ४ रुग्ण, पांगारे प्रत्येकी ३ रुग्ण, कोथळे, खळद, जवळार्जून, साकुर्डे, नवलेवाडी, हरगुडे, भिवडी, आडाचीवाडी, दौंडज, हरणी प्रत्येकी २ रुग्ण, तर खानवडी, मावडी क.प., नाझरे क.प., निळुंज, पोंढे, राजुरी, पिंपरी, राजेवाडी, वनपुरी, पिंपरे खुर्द, सटलवाडी, मांढर, कोडीत बु., हिवरे, वारवडी, थोपेवाडी, सुपे खुर्द, नारायणपूर, देवडी, वाल्हे, पिसुर्डी, नावळी प्रत्येकी १ रुग्ण सक्रिय आहेत.
पुरंदर तालुक्यात बुधवारी १७ हजार ३९४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. ३५७ बाधितांचा मृत्यू झाला. १६ हजार ८५१ रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, तर तालुक्यात ४८ गावांत १८६ रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
मंगळवार (दि. २१) अखेर पुरंदर तालुक्यातील १ लाख ९८ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले असून, पहिला डोस १ लाख २२ हजार ४३३ लोकांना, तर ७६ हजार ४८८ लोकांना दुसरा डोस दिल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.